इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कात्रजः कात्रज घाटात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. मुंबईस्थित एका कंपनीची क्रेटा गाडी अचानक पेट घेतल्याने घाटात मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपासानुसार, गाडीच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या आगीत वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
घटनास्थळी अद्याप अग्निशमन दल पोहोचलेले नसून, स्थानिक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीभोवतीची गर्दी हटवून सुरक्षेची व्यवस्था केली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घाटात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिकांनी व पोलिसांनी मिळून गाडीच्या आजूबाजूची परिस्थिती नियंत्रणात ठेवली असून, आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या इतर यंत्रणांची प्रतीक्षा सुरू आहे.