Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजकाँक्रीट मिक्सरने चिरडल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, मांजरी येथील घटना...

काँक्रीट मिक्सरने चिरडल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, मांजरी येथील घटना…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील मांजरी येथे ओव्हरटेक करताना काँक्रीट मिक्सर वाहनाचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचकीस्वार महिला मिक्सरच्या मागील चाकाच्या खाली येऊन चिरडली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणु ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय 38 वर्ष, रा. केशवनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी मृत्यू झालेल्या महिलेचे पती ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय 39 वर्ष, रा. केशवनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रम्हशंकर त्यांच्या पत्नीसोबत रविवारी (4 मे) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खरेदीसाठी केशवनगर-मांजरी रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. यावेळी फिर्यादी हे दुचाकी चालवित होते तर त्यांच्या पत्नी मागे बसल्या होत्या. काँक्रीट मिक्सर (एमएच 12 एक्सएम 8141) ने फिर्यादी यांच्या दुचाकीला उजवीकडून ओव्हरटेक करताना धक्का लागला.

त्यावेळी फिर्यादी आपल्या दुचाकीसह डाव्या बाजूला जाऊन पडले. तर त्यांची पत्नी डाव्या बाजूला पडली आणि काँक्रीट मिक्सरच्या मागील चाकाच्या खाली चिरडली गेली. ही घटना मांजरी येथील तुपे कॉर्नर खाऊ गल्ली समोरच्या रस्त्यावर घडली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून महिलेला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments