इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कर्जतः कर्जतमध्ये एका फार्महाऊसवर ड्रग्ज कारखाना सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. किकवी भागात शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्जचा कारखाना सुरु होता. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांनी किकवी येथील सावली फार्महाऊसवर छापा टाकून अंदाजे ११.०५ कोटी रुपये किमतीचे ५.५ किलोग्रामपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केले. तसेच 1 कोटी रुपयांचा ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील किकवी इथं शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थ निर्मिती केली जात होती.