Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजऔद्योगिक वसाहतीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोबाईल, पैसे लुटणारी टोळी सक्रिय

औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोबाईल, पैसे लुटणारी टोळी सक्रिय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सणसवाडी : शिरुर तालुक्यातील औद्यगिक परिसर म्हणून ओळख असणाऱ्या सणसवाडी येथील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कामगाराकडे असणाऱ्या मोबाईल, पैसे लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. यांचा मोठा फटाका गरीब कामगारांना होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी कंत्राटी कामगारांचा सुपरवायझर दुपारची पाळी संपून घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालत्या गाडीतून खाली पडून त्या व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका कामगारांचा हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो प्रयत्न असफल ठरला. रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा लाईट नसल्याने चोरटे यांचा फायदा घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अशा परिस्थितीत कामगारांनी पोलिसाशी संपर्क करून तक्रार नोंद करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीची गस्त वाढवली जाईल. कामगारांनी घाबरून न जाता पोलीस स्टेशनशी निशंकोच संपर्क साधावा, असे आश्वासन देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments