Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी खराडीचा ट्रॅक कर्वेनगरला हलविला

ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी खराडीचा ट्रॅक कर्वेनगरला हलविला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) च्या कार्यक्षेत्रातील मीटर तपासणीची मुदत संपलेल्या ऑटोरिक्षा चालक/मालक यांच्या सोयीसाठी ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं. ३ (२) इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर, खराडी हे दोन नवीन ट्रॅक निश्चित केले होते.

परंतु, खराडी येथील ट्रॅक ऑटोरिक्षा चालकांसाठी गैरसोयीचा असल्याने तो बंद करून त्याऐवजी कर्वेनगर येथील अलंकार पोलीस चौकीसमोर टेस्ट ट्रॅक सुरू करावा, अशी मागणी ऑटोरिक्षा संघटनांनी केली होती. त्यानुसार कर्वेनगरचा ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा चालकांच्या सोयीसाठी १९ सप्टेंबरपासून खराडी येथील ट्रॅक बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी कर्वेनगर येथील अलंकार पोलीस चौकीसमोर, कर्वेनगर येथे ट्रॅक सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments