Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजएसटीच्या स्वारगेट आगाराची इमारत धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये उघड, दुरुस्तीसाठी लागणार ६० लाख...

एसटीच्या स्वारगेट आगाराची इमारत धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये उघड, दुरुस्तीसाठी लागणार ६० लाख रुपये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराच्या इमारतीचे बीम कमकुवत झाले असून, इमारत धोकादायक बनली आहे. नुकतेच एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने एका खासगी संस्थेकडून स्वारगेट बसस्थानकाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. या स्ट्रक्चरल ऑडिटमधून ही बाब उघडकीस आली असून, या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपयांचा निधी लागणार आहे. पुणे एसटी विभागाने मुख्य कार्यालयाकडे निधी देण्याची मागणी केली आहे.

स्वारगेट एसटी स्थानकाची इमारत ही संशयास्पद या श्रेणीत आढळून आली आहे. खांबांना आधार देणाऱ्या अनेक बिम व लोखंडी रॉडमध्ये समस्या असल्याचे अहवालात दिसून आले आहे. त्यामुळे त्याची दुरुस्त करावी लागणार आहे. त्यादृष्टिकोनातून एसटीच्या प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार या कामासाठी ६० लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. हा लेखापरीक्षणाचा अहवाल आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा प्रस्ताव निधीसह एसटीच्या मुख्य कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. पुणे एसटी विभागातील स्वारगेट महत्त्वाचे आगार आहे. या आगारातील इमारत १९६५ साली बांधण्यात आली. सध्या या आगारातून दिवसाला ५०० ते ६०० बसची ये-जा सुरू असते. तर, दररोज २५ ते ३० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. या आगारातील इमारत खूप जुनी आहे.

अलीकडच्या काळात स्वारगेट आगारात पावसाचे पाणी साठणे, तसेच इतर प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. थोडा पाऊस पडला तरी आगारात तळे साठते. त्यामुळे त्याच्या कामासाठी पैसेदेखील मंजूर झाले आहेत. त्यामुळे ही कामे करण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सध्या स्वारगेट आगारात २० लाख रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये आगारामध्ये सिमेंट क्रॉक्रिटीकरण, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारणे अशी कामे केली जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments