इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अहिल्यानगरः अहिल्यानगर-पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग (ST Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागलेली ही बस नगरहून पुण्याकडे जात होती. एसटी बसला भीषण आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बसच्या चालकानं प्रसंगावधान राखत एसटी रोडच्या बाजूला घेऊन थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी एसटी बसला आग लागल्याने नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या या रस्त्यावर धीम्या गतीनं वाहतूक सुरु आहे, अशी माहिती समोर येत आहे.