Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजउरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय कानकाटे (सर) यांचे...

उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय कानकाटे (सर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे): कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील माजी उपसरपंच व उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय निवृत्ती कानकाटे (वय- 51) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सोमवारी (ता. 23) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, उरुळी कांचन व परिसरात आपल्या प्रेमळ स्वभावामुळे व स्पष्ट वक्त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व होते. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याची मोठी आवड त्यांना होती.

दरम्यान, विजय कानकाटे यांचे चुलते लक्ष्मण रामचंद्र कानकाटे यांचे 29 ऑगस्टला निधन झाले होते. एकाच घरातील दोघांचे महिन्याच्या आत निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील सुनील लक्ष्मण कानकाटे यांचे ते चुलत बंधू होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments