इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली असून मुलीचे लग्न आमच्या मुलाबरोबर लावून दिले नाही तर खून करू, अशी धमकी मुलाच्या आईवडिलांनी दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मुलासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
सैफअली पठाण असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. हा प्रकार मार्च 2024 ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला. याबाबत पीडित 17 वर्षीय युवतीच्या आईने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफअली पठाण याने इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिला कॉलेजच्या बाहेर बोलावून विश्वासात घेतले. यावेळी तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील चाळे केले तसेच किस घेतला. पुढे लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या काळात तिच्या नकळत तिचे अश्लील फोटो काढले.
यानंतर सैफअली पठाण याच्या आईवडिलांनी पीडित मुलीच्या आईला धमकावत, “तुझ्या मुलीचे लग्न आमच्या मुलाशी लावून दे. अन्यथा तिचे फोटो व्हायरल करू, तसेच तू लग्न लावून दिले नाही तर तुझा आणि तुझ्या मुलीचा खून करू, असा इशारा दिला. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.