इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गावाचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी तालुक्यात तब्बल 17 हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा केला असून, याबाबतचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप पाटील यांनी स्थानिक स्तरावरच मोठा खुलासा केला आहे. पाटील यांनी आपल्या गावातच 200 पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर या बोगस मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या प्रकरणातील 78 मतदार बोगस असल्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांची बदली झाल्याने त्या आदेशावर सही होऊ शकली नाही. त्यानंतर नवीन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी या गंभीर प्रकरणाकडे
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाहीची शुचिता टिकवण्यासाठी बोगस मतदारांचा प्रश्न गांभीयनि सोडवला गेला पाहिजे. आम्ही न्यायालयाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा करतो.” असे पाटील यांनी स्पष्ट केले. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे आता या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.