Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजआम्हीही एन्काऊंटरचीच वाट बघायची का, आम्हाला न्याय कधी? पुण्यातील 'त्या' चिमुरडीच्या पालकांचा...

आम्हीही एन्काऊंटरचीच वाट बघायची का, आम्हाला न्याय कधी? पुण्यातील ‘त्या’ चिमुरडीच्या पालकांचा संतप्त सवाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या त्या दोन्ही चिमुरडींना न्याय मिळाला आहे. बदलापूर प्रकरणाप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून 26 वर्षीय नराधमाने तिचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेला तब्बल दोन वर्ष उलटून गेली आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात आलं.

त्यानंतर घटनेतील नराधम आरोपी तेजस महिपती दळवी याला फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सहा ते आठ महिने उलटून गेले आहेत. तरी देखील आरोपीला फाशी देण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या चिमुरडीच्या पालकांनी आम्हीही एन्काउंटरचीच वाट बघायची का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

दुसरीकडे बदलापूर प्रकणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून पीडित कुटुंबाला एक प्रकारे न्याय मिळाला आहे. त्यांच्या या प्रकरणातून होणारा मनस्ताप कुठे तरी थांबला. पण आमच्या नशिबी मात्र, अजूनही त्रास आहे. त्या नराधमाला शिक्षा होवूनही फासावर लटकवले जात नाही. एन्काउंटर करणे हा मार्ग नाही हे मान्य आहे. पण आम्ही अजून किती काळ त्याला फासावर लटकवण्याची वाट पाहायची असा संतप्त सवाल पीडित कुटुंबाने केला आहे. त्यामुळे आरोपीला तात्काळ फासावर देवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.

मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात 2 ऑगस्ट 2022 रोजी एका 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा खून करण्यात आला. पुढच्याच दिवशी म्हणजे 3 ऑगस्टला तिचा मृतदेह भेटला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला चोवीस तासाच्या आता बेड्या ठोकल्या होत्या. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालले. 29 साक्षिदार तपासले गेले. पुढे 23 मार्च 2024 रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments