Thursday, July 10, 2025
Homeक्राईम न्यूजआम्ही तुला सांभाळतो, जे पाहिजे ते करू दे", आत्याच्या नवऱ्यानेच साधला डाव,...

आम्ही तुला सांभाळतो, जे पाहिजे ते करू दे”, आत्याच्या नवऱ्यानेच साधला डाव, १२ वर्षीय चिमुकली गर्भवती राहिल्याने सत्य उघड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी मुंबई, पनवेलः नात्यातील विश्वासाला तडा देणारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पनवेल शहरात समोर आली आहे. एका नराधमाने १२ वर्षांच्या निराधार तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अमानवी कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हे भीषण वास्तव समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी काकाला अटक केली आहे.

पीडित मुलगी काही वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांच्या निधनानंतर पनवेलमध्ये राहणाऱ्या आत्याकडे राहायला आली होती. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, आत्याच्या पतीने (आरोपी) तिच्यावर वाईट नजर ठेवली आणि वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. मुलगी लहान असल्याने भीतीपोटी तिने ही गोष्ट कोणालाही सांगण्याची हिंमत केली नाही.

मुलीच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. तिने आत्याला “पोटात काहीतरी वेगळं जाणवतंय” असे सांगितले. तिच्या बोलण्यावरून संशय आल्याने आत्याने तिला तात्काळ रुग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट केले, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.

या धक्कादायक खुलासा होताच, मावशीने मुलीसह थेट पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सविस्तर सांगितला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO Act) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments