इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीसलागल्या असून, वानवडीतील शाळकरी मुलींशी व्हॅनचालकाने अश्लीलकृत्य केल्याची घटना ताजी असतानाच खराडी परिसरातील एकाशाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटनागुरुवारी (दि. ३) उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी या शाळेततिसरीत शिकते. मुलीची आई तिला घरात चांगल्या आणि वाईटस्पर्शाबाबत (गुड टच आणि बॅड टच) माहिती देत होती. त्यावेळी मुलीनेशाळेतील संजय सर नावाच्या एका व्यक्तीने प्रसाधनगृहाच्या बाहेरवाईट पद्धतीने स्पर्श केल्याचे आईला सांगितले.
त्यानंतर आई गुरुवारी (दि. ३) शाळेत गेली व तिने मुख्याध्यापिकेच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पोलिसांच्या दामिनी पथकाला या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुलीला शाळेतील शिक्षकांची छायाचित्रे दाखविण्यात आली. मात्र, अश्लील कृत्य करणारी व्यक्ती दुसरी असल्याचे तिने सांगितले. तपासासाठी पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.