इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : गेल्यावर्षी पेक्षा या कंपनीने यंदा चांगली कामगिरी बजावली. नफ्यात 1.68% टक्क्यांची वाढ नोंदवली. या कंपनीला गेल्या वर्षी 68.25 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर यंदा कंपनीने 69.4 कोटींचा नफा कमावला. पण हा आनंद दीर्घकाळ काही टिकला नाही. एका नोटीसने कंपनीच्या आनंदावर विरजण घातले. या कंपनीला जीएसटी कार्यालयाने 6236.81 कोटीच्या कराची नोटीस बजावली. या कंपनीचे बाजारातील भांडवल 3700 कोटी रुपये आहे. यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. या कंपनीच्या शेअरवर या वृत्ताचा परिणाम दिसून येऊ शकतो.
डेल्टा कॉर्पमध्ये भूंकप
ही कंपनी डेल्पा कॉर्प आहे. तिची उपकंपनी डेल्टा टेक गेमिंगला ही नोटीस मिळाली आहे. डेल्टा टेकला 6236.81 कोटी रुपयांची जीएसटीची मागणी करण्यात आली आहे. या वृत्ताचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर होण्याची शक्यता आहे. एका महिन्यात या कंपनीचा शेअर 21 टक्क्यांनी घसरला आहे. तर एका वर्षात कंपनीच्या शेअरने 40 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. शुक्रवारी या कंपनीचा शेअर घसरणीसह बंद झाला. हा शेअर 0.85 टक्के घसरला. हा शेअर शेवटच्या सत्रात 140 रुपयांवर बंद झाला.
महसूल वधारला
कंपनीने दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी बजावली. एकत्रित नफ्यात 1.75 टक्क्यांची वाढ झाली. 69.4 कोटी रुपयांवर नफा पोहचला. गेल्यावर्षीच्या या तिमाहीत हा आकडा 68.2 कोटी रुपये होता. या कंपनीचे वर्षा आधारित महसूल 270 कोटी रुपयांहून 271 कोटी रुपयांवर पोहचला. कंपनीच्या EBITDA मध्ये किंचित घसरण झाली. वार्षिक आधारावर 100.4 कोटींहून 100.3 कोटींवर घसरली. कंपनीने या घडामोडीत अनिल मलानी यांना चीफ फायनेन्शिअल ऑफिसर म्हणून तर मनोज जैन यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती दिली आहे.
काय आहे जीएसटीचा दावा
डेल्टा कॉर्प कंपनीने जीएसटीचा कमी भरणा केल्याचा दावा जीएसटी विभागाने केला आहे. कंपनीला वस्तू आणि सेवा करातंर्गत (GST) ही नोटीस बजावण्यात आली आहे. 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. डेल्टासोबत Dream 11 इतर कंपन्यांना पण जीएसटीची नोटीस बजावण्यात आली आहे.