Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज Starbucks ने नोकरीवरुन काढले पट्ट्याने घेतला असा भन्नाट बदला, वाचाल तर हैराण...

Starbucks ने नोकरीवरुन काढले पट्ट्याने घेतला असा भन्नाट बदला, वाचाल तर हैराण व्हाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 16 ऑक्टोबर 2023 : एखाद्याला जर नोकरीवरुन काढून टाकले तर तो काय करु शकतो याचे खतरनाक उदाहरण एका जगप्रसिद्ध कॉफी हाऊसबद्दल घडलं आहे. जगभरातील प्रसिद्ध कॉफी हाऊस चेन स्टारबक्सच्या (Starbucks) एका माजी कर्मचाऱ्याने इंटरनेटवर अक्षरश: थैमान घातले आहे. त्याने कंपनीच्या सर्वात पसंत केल्या जाणाऱ्या ड्रींक्सची रेसिपीच ऑनलाईन शेअर करुन टाकली आहे. त्याला नोकरीवरुन काढताच त्याने हा अनोखा बदला घेतला आहे. त्याची ही पोस्ट शेअर झाल्यानंतर तुफान व्हायरल झाली आहे. लोक या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ट्वीटरवर (एक्स) कल्याणनावाच्या युजरने लिहीले आहे की, ‘स्टारबक्सच्या एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे. आणि त्याने स्टारबक्सच्या सर्व ड्रींकची रेसिपी पोस्ट केली आहे. आपले स्वागत आहे. युजरने माजी कर्मचाऱ्याद्वारा शेअर केलेल्या फोटोंना एक्सवर पोस्ट केले आहे. या फोटोत व्हाईट चॉकलेट मोचा, कोकोनट मिल्क, वेनिला लाटे, आईस्ड कॅरेमल, कोल्ड ब्रु विद कोल्ड फोआमचा समावेश आहे. या पोस्टला 14 ऑक्टोबरला शेअर केले होते. त्यानंतर या पोस्टला 9.53 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 21 हजार लोकांनी त्यास लाईक केले आहे. 5 हजाराहून अधिक लोकांनी रिट्वीट केले आहे. तर मोठ्या प्रमाणात या पोस्टला प्रतिक्रीया आल्या आहेत.

अशा भन्नाट प्रतिक्रीया आल्या

एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहीले आहे की, आता आपण उत्तम ड्रींक्स बनवू शकतो आणि त्याचे नामकरणही करू शकतो. आणि त्यास Arine Grande वा काहीही बोलू शकतो. अन्य एका युजरने लिहीले की, मी ही पोस्ट सेव्ह केली आहे. परंतू तरीही माझ्या फेव्हरेट कॉफीसाठी मी स्टारबक्स जाईनच. तिसऱ्या युजरने लिहीलेय की जेव्हा तुम्ही यास घरी बनवाल, तेव्हा त्यास स्टारबक्सवाली टेस्ट आणि ‘वाइब येणार नाही. चौथे एका युजरने म्हटलंय, ‘थोडीसी कॉफी, खूप सारी साखर आणि गोड चॉकलेट, सिरप, स्प्रिंकल्स आणि फोम बरोबर • पंप केलेले दूध, जोवर तुम्हाला सारखेची सवय नसेल, जादावेळ तर पिण्याच्या लायकीचे नसते तर काही युजरने या कर्मचाऱ्यावर तर केस टाकायला हवी अशी प्रतिक्रीया देखील दिली आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments