Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजPM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटलाः शरद पवार गट अन् काँग्रेस नेत्याचा...

PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटलाः शरद पवार गट अन् काँग्रेस नेत्याचा संताप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जिरेटोप चढवला. त्यामुळे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट संतप्त झाला आहे. त्यांनी पटेल, मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

मोदींनी मंगळवारी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी एनडीएचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. हे दृश्य पाहताच राष्ट्रवादी शरद पवार गटात संतापाची लाट उसळली. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पटेल यांना उद्देशून म्हणाले की, पटेल लाज बाळगा, “जिरेटोप’ आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर तो शोभत नाही. समाजमाध्यमांवर टाकलेल्या पोस्टमध्ये जगताप यांनी म्हटले आहे की, रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे…. अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवण्णा, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुद्धी कुठे, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणाऱ्या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या बद्दल त्यानी जाहीर माफी मागावी. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलेल्या टीकेला अजित पवार गट किंवा भाजपकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments