Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज Pimpri Chinchwad: ११ महिन्यांत दोन हजार चोऱ्या; ९०५ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Pimpri Chinchwad: ११ महिन्यांत दोन हजार चोऱ्या; ९०५ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पोलिसांनी पायी गस्त तसेच रात्र गस्तीवर भर दिल्याने पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत चोरीच्या प्रकारांमध्ये घट झाली. चोरीप्रकरणी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २०२२ मध्ये २५२२ तर यंदा ११ महिन्यांमध्ये २१२४ गुन्हे दाखल झाले, तसेच चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाणदेखील यंदा जास्त आहे.

७३५ गुन्हे उघडकीस

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत चोरीचे गुन्हे यंदा घटले. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत चोरीचे ६४५ गुन्हे उघड झाले. चोरीच्या एकूण दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत हे २६ टक्के प्रमाण होते, तर यंदा ७३५ गुन्हे उघड झाले. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत ३४ टक्के प्रमाण आहे.

चोरट्यांना रंगेहाथ पकडले

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यंदा ११ महिन्यांत चोरीच्या गुन्ह्यातील ९०५ संशयितांना अटक केली. यात काही चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

एमआयडीसीत सर्वाधिक चोऱ्या

पोलिस आयुक्तालयांतर्गत एमआयडीसीचा मोठा परिसरत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमधील साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार जास्त घडतात, तसेच उघड्या दरवाजावाटे मोबाइल, लॅपटॉप चोरीचे प्रकारही जास्त आहेत. यासोबत मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे.

पोलिसांपुढे अडचणींचा डोंगर

गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्ह्यातील संशयितांचा माग काढणे, ओळख पटवणे सहज शक्य होत नाही. तसेच सततचा बंदोबस्त, व्हीआयपींचे दौरे यामुळे तपासात सातत्य राहत नाही. गुन्ह्यांच्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक गुन्ह्यांचा तपास करावा लागतो.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments