Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज "NEP अंमलबजावणीवर बहिष्कार टाकणार..."; उच्च शिक्षण मंत्री आणि संघर्ष समितीची बैठक निष्फळ

“NEP अंमलबजावणीवर बहिष्कार टाकणार…”; उच्च शिक्षण मंत्री आणि संघर्ष समितीची बैठक निष्फळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : प्राध्यापक पदभरती संदर्भात नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत नागपूर येथे झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. एनईपी अंमलबजावणीमुळे प्राध्यापकांच्या कार्यभार निश्चित करण्याबाबत शासनस्तरावर संदिग्धता निर्माण झाली आहे त्यामुळे प्राध्यापकांची पदे भरण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. बैठकीमध्ये विविध मागण्यांसदर्भात सकारात्मक तोडगा न निघाल्याने समितीतील पदाधिकारी आक्रमक झाले असून राज्यातील रीक्त प्राध्यापकांची पदे भरा अन्यथा एनईपी अंमलबजावणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने ऐन दिवाळीत उच्च शिक्षण संचालक कार्यालयसमोर अन्नत्याग आंदोलन छेडले होते. त्यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करीत समितीला बैठकीचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले होते. दरम्यान, उच्च शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहायक प्राध्यापक पदभरती व इतर प्रश्नासंदर्भात दि. १८ रोजी नागपूर येथील विधान भवन येथे नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीची बैठक पार पडली झाली.

केंद्र शासन व युजीसीच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुधारित आकृतिबंध मंजूर करून शासकीय, अनुदानित महाविद्यालय व आकृषी विद्यापीठ यामध्ये सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदासह शंभर टक्के भरती करावी. युजीसीच्या निर्देशानुसार तासिका तत्वाचे धोरण बंद करून समान कामासाठी समान वेतन लागू करावे. सध्या सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून ती वेळेत पूर्ण करावी. विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करावी. तासिका तत्वाचे शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०२२ व २७ मार्च २०२३ चे काटेकोर पालन करावे आदी मागण्या समितीतर्फे डॉ. प्रमोद तांबे, डॉ. परमेश्वर पौळ व प्रा. सुरेश देवढे पाटील यांनी मांडल्या.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments