Friday, August 1, 2025
Homeक्राईम न्यूजLPG सिलेंडरच्या दरात मोठी घट, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

LPG सिलेंडरच्या दरात मोठी घट, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः तेल कंपन्यांनी १ ऑगस्टपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ३३.५० रुपयांची घट झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्याच्या अधाव्यानंतर व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६६५.०० रुपयांवरून १६३१.५० रुपये झाली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिक निराश झाले आहेत. घरगुती वापराच्या गॅसचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही.

याआधी व्यावसायिक सिलेंडरचे जुलैमध्ये ५८.५० रुपये, जूनमध्ये २४ रुपये, मेमध्ये १४.५० रुपये आणि एप्रिलमध्ये ४१ रुपयांनी दर कमी झाले होते. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग पाचव्या महिन्यात कपात झाली आहे. या सलग कपातीमुळे व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील महिन्यात घरगुती गॅसचे दर कमी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments