इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या म्हणजेच 1फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशातील सर्वसामान्यांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे असतानाच, यासोबतच देशात 5 मोठे बदल देखील पहिल्या तारखेपासून केले जाणार असल्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात आणि सुधारित दर जाहीर करतात. याचा परिणाम घरच्या स्वयंपाकघरापासून ते रेस्टॉरंट आणि इतर क्षेत्रांपर्यंत सर्व गोष्टींवर होतो. 1 फेब्रुवारी रोजी कंपन्या एलपीजीचे नवीन दर देखील जारी करू शकतात. गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती अनेक वेळा बदलल्या आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.
UPI व्यवहाराशी संबंधित नवीन नियम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’शी संबंधित एक नवीन नियम म्हणजेच UPI देशात लागू होणार आहे. भारतातील अनेक लोक पेटीएम, फोन-पे आणि गुगल पेच्या मदतीने UPI वापरतात. पण 1 फेब्रुवारीपासून UPI चे नियम बदलणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, इतर अनेक बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.