Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्ह इन रिलेशन, प्रेग्नेंसी,...

Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्ह इन रिलेशन, प्रेग्नेंसी, हृदयद्रावक निधनानंतर…..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कुटुंबियांची, मित्र-परिवाराची, समाजाची पर्वा न करता फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं. ८० ९० च्या दशकात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री स्वतःच्या अटी शर्थीवर जगल्या. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी होती जिचं विवाहित अभिनेत्यावर जीव जडला. सिनेमाच्या सेटवर झालेल्या पहिल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे दोघांनाच्या नात्याला अनेकांनी विरोध केला. अखेर दोघांनी ८०, ९० च्या दशकातलिवइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने प्रियकराच्या मुलाला जन्म देखील दिला….

खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहीली. ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्यामुळे अभिनेत्रीला आपले प्राण गमवावे लागले. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलिवूडच्या ‘लेडी सुपरस्टार’ला चाहते विसरू शकले नाहीत. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्मिता पाटील आहे.

स्मिता पाटील हिचं नाव बॉलीवूडच्या सशक्त अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. स्मिता पाटील यांनी महिलांवर आधारित अनेक सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी • आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलके’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राज आणि स्मिता एकमेकांच्या फार जवळ आहे. त्यांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं.. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते.

विवाहित राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली अनेकांना दोघांच्या नात्याला विरोध देखील केला त्यानंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. पण डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे स्मिता पाटील यांचं हृदयद्रावक निधन झालं..

वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरच्या श्वास घेतला. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक बब्बर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच प्रतीकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव बदलल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर.. असं नाव असल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर देखील त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments