Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज Kohinoor Square Fire: मुंबईत दादरमधल्या कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; 17 ते...

Kohinoor Square Fire: मुंबईत दादरमधल्या कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; 17 ते 18 गाड्या जळून खाक, आगीवर नियंत्रण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Mumbai Fire Updates: मुंबईच्या (Mumbai News ) दादरमधील (Dadar) कोहिनूर स्क्वेअर इमारतीमध्ये (Kohinoor Square) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipality) पार्किंगमध्ये (Parking Lot) मध्यरात्री मोठी आग लागली. चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे 10 ते 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहेत.

सध्या फायर कूलिंगचं काम सुरु आहे. सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेली कोहिनूर स्क्वेअर इमारत तशी वर्दळीच्या ठिकाणी आहे. दादर पश्चिमेत शिवसेना भवन समोरच असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग लॉट आहे. या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं. सध्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये फायर कुलिंगचं काम सुरू आहे.

सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. लागलेल्या आगीसंदर्भात स्थानिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, कंत्राटदारांकडून नियमांच उल्लंघन करून गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे ही आग लागली. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments