Monday, December 11, 2023
Home कल्याण Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या...

Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कल्याण | 17 ऑक्टोबर 2023 : रेल्वेतून प्रवास करताना अनेक जण तिकीट न काढताच, फुकट (without ticket) प्रवास करत असतात. बरेच वेळा टीसींकडून पकडले गेले तरी, दंड भरावा लागला तरीही ते धडा शिकत नाहीत आणि फुकट प्रवास सुरूच ठेवतात. नागरिकांची लाईफलाइन असलेल्या मुंबई रेल्वेतूनही (सहवोग तदमोत) अनेक जण फुकट प्रवास करतात. सध्या फुकट्या प्रवाशांची संख्याही खूप वाढली आहे. हेच लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

कल्याण स्टेशनवर दीडशेहून अधिक टीसींनी (तिकीट तपासनीस) (TC) फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. दिवसभरात ४ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना रोखून त्यांच्यावर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्या दंडाची एकूण रक्कम सुमारे 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तुम हमसे फिर से छुप रहे हो… और हम तुम्हारा स्टेशन पे फिर से इंतजार कर रहे हैं!”

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची, तिकीट न काढताच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे रेल्वे विभागाची डोकेदुखी वाढली आहे. लोकलमधील फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत अनेक जण विना तिकीट प्रवास करण्यात यशस्वी होत असल्याने त्यांची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वेने ही मोहीम उघडली होती.

सोमवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत तब्बल 167 टीसींनी साखळी करत कल्याण स्टेशनवर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत टीसींनी फुकट्या प्रवाशांची नाकेबंदी केली. दिनसभरात टीसींनी तब्बल 4438 अशा प्रवाशांना रोखले, ज्यांनी तिकीट काढलं नव्हतं म्हणजेच ते फुकट प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांकडून जो दंड वसून करण्यात आला तो होता तब्बल 16.85 लाख रुपये. कल्याण स्टेशनवर झालेल्या मोहिमेच्या धर्तीवर आता रेल्वेच्या इतर स्टेशनवरही अचानकपणे मोठ्या संख्येने टीसी तैनात करून तिकीट तपास मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.

कल्याण स्थानक – 16.85 lakh penalty imposed in a a single day on 4438 ticketless passengers.

• From 7.00 to 23.00 Hrs

• Total TTE deputed-167 Total RPF staff deputed-35

• Total ticketless passengers caught- 4438 • Total penalty imposed on them- 16.85 lakhs

• Average number of passengers caught by one TTE- 27 • Average penalty imposed by a TTE- 10095/-

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments