Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज IND vs NZ | इंडिया-न्यूझीलंड मॅचमधून कर्णधार-उपकर्णधार आऊट, टीमला झटका

IND vs NZ | इंडिया-न्यूझीलंड मॅचमधून कर्णधार-उपकर्णधार आऊट, टीमला झटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 21 वा सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे एचपीसीए स्टेडियम धर्मशाळा येथे करण्यात आले आहेत. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सलग 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोण पाचवा सामना जिंकणार आणि कोणाची विजयी घोडदौड थांबणार हे स्पष्ट होईल. दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकला आहे. रोहितने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे टीम इंडिया सलग पाचव्यांदा चेज करणार आहे.

टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या याने माघार घेतली आहे. तर शार्दुल ठाकुर याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर या दोघांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद •शमी आणि सूर्यकुमार यादव हे दोघे कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष राहणार आहे.

कर्णधार आणि उपकर्णधार बाहेर

दरम्यान टीम इंडिया-न्यूझीलंड या दोन्ही संघांना मोठा फटका बसला आहे. या सामन्यातून कर्णधार आणि उपकर्णधार हे बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याला बांगलादेश विरुद्ध सामन्यात बॉलिंग दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे हार्दिक खेळत नाहीयेत. तर केन विलियमनस हा न्यूझीलंडचा नियमित कर्णधार आहे. केनने आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केलं होतं. मात्र त्याच सामन्यात बॅटिंगदरम्यान केनच्या हातावर बॉल लागल्याने त्याला दुखापत झाली. तेव्हापासून केन टीममधून बाहेर आहे. त्यामुळे नच्या जागी आता टॉम लॅथम हा न्यूझीलंडचं नेतृत्व करतोय..

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल,विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट,

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments