Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज FTII मधील वादग्रस्त बाबरी पोस्टर प्रकरणः सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सुरक्षारक्षकाला...

FTII मधील वादग्रस्त बाबरी पोस्टर प्रकरणः सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी वादग्रस्त पोस्टर लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

त्रिशा बंदना मन्ना, सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत ऋतुजा अतुल माने (रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ऋतुजा माने समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्षा आहेत. ‘एफटीआयआय’च्या आवारात मंगळवारी ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा प्रकारचा फलक लावण्यात आल्याची माहिती मंगळवारी उघड झाली.

त्यानंतर माने याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कार्यकर्त्यांना दिली. ‘एफटीआयआय’च्या आवारात स्टुडंट्स असोसिएशनने फलक लावल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या पोस्टरने सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. धार्मिक सलोखा बिघवडविण्याचे काम विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे माने यांनी तक्रारीत सांगितले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

‘एफटीआयआय’च्या सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल

‘एफटीआयआय’च्या आवरात बेकायदा प्रवेश करून गोंधळ

घातल्याप्रकरणी समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘एफटीआयआय’चे सुरक्षारक्षक संजय जाधव (वय ५२) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संस्थेतील विद्यार्थी देशविरोधी काम करतात, असा आरोप करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या आवारात गोंधळ घातला. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. संस्थेच्या आवारात लावलेले फलक जाळून घोषणबाजी केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे जाधव यांनी तक्रारीत सांगण्यात आले आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, १२ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गजानन चोरमले पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments