इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अर्थात ESIC विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, काही पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर येथे नोकरी मिळू शकते. त्यानुसार, आता ९ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. वैद्यकीय अधिकारी (गट-अ) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 असून, सदर अर्ज हे वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, राज्य कामगार विमा योजना (महाराष्ट्र शासन) आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा नागपूर-४४०००३ येथे अर्ज पाठवावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे