Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज Chandrayaan-3 | हा Video बघा, चंद्रावर महिंद्राच्या THAR ची लँडिंग, थँक्यू ISRO,...

Chandrayaan-3 | हा Video बघा, चंद्रावर महिंद्राच्या THAR ची लँडिंग, थँक्यू ISRO, नेमकं प्रकरण काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव आहेत. फॉलोअर्समध्ये ते इंटरेस्टिंग, प्रेरणादायी आणि क्रिएटिव पोस्ट करण्यासाठी ओळखले जातात… महिंद्रा सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट करतात, त्याची चर्चा होतेच. सध्या त्यांची X वरची पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये महिंद्रा कंपनीची सर्वाधिक चर्चेत SUV Thar-E ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना दाखवलं आहे. हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया. उद्योगपती महिंद्रा यांनी अलीकडेच मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर एक नवीन व्हिडिओ शेअर केलाय. चांद्रयान 3 च्या यशासाठी ISRO ला शुभेच्छा देताना ते आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या आहेत. एकदिवस त्यांना थार SUV ला चंद्रावर धावताना पहायच आहे. लँडरमधून थार SUV चंद्राच्या पुष्ठभागावर उतरताना दाखवली आहे.

हा एक एनिमेटेड व्हिडिओ आहे. महिंद्रा एंड महिंद्रा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने हा व्हिडिओ बनवलाय. या जाहीरातीच्या माध्यमातून महिंद्रा कंपनीने लोकांना समजावण्याचा प्रयत्न केलाय. तो दिवस दूर नाहीय, जेव्हा लोक चंद्रावर रहायला सुरुवात करतील. पृथ्वीप्रमाणे तिथे सुद्धा कारस धावू लागतील. 10 सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत 7 लाख व्यूज आले आहेत. 21 हजारपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट लाइक केलीय. त्याशिवाय ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जातेय. त्यावर कमेंट येत आहेत. ISRO आणि महिंद्र सर काहीही करु शकतात, असं एका युजरने म्हटलं आहे. महिंद्राची थार चंद्रावर पोहोचली, असं दुसऱ्या युजरने म्हटलय. तिसऱ्याने म्हटलय, बेट लावा, महिंद्राची थार चंद्रावरच्या ऊबड़खाबड रस्त्यावर सुद्धा मस्क्यासारखी पळेल.

होप एक्सपीरिमेंट यशस्वी

दरम्यान इस्रोने पुन्हा एकदा कमाल केलीय. इस्रोला दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आलं. विक्रम लँडरवर होप एक्सपीरिमेंट यशस्वी ठरली. “कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरच इंजिन चालू झालं. जमिनीपासून 40 सेमी वर हा लँडर गेला. तिथून पुन्हा 30-40 सेमी अंतरावर जाऊन लैंडिंग केलं” असं ISRO ने सांगितलं. “भविष्यात लँडरला परत पृथ्वीवर आणणं आणि मानवी मिशनसाठी ट्रायल करणं हा या प्रयोगामागे उद्देश होता” असं इस्रोकडून सांगण्यात आलं.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments