Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज Bigg Boss 17 मध्ये प्रॅक करणं विकी जैनला पडलं महागात, बिग बॉसकडून...

Bigg Boss 17 मध्ये प्रॅक करणं विकी जैनला पडलं महागात, बिग बॉसकडून ओरडा, पत्नी अंकिताही नाराज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ हा नुकताच सुरू आहे. 15 ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला आणि त्यात • सहभागी झालेल्या 17 स्पर्धकांच्या चेहऱ्यावर पडदा उचलण्यात आला. अगदी पहिल्या एपिसोडपासूनच हा शो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बिग बॉसचं घर यंदा तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागलं गेलं आहे. यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. मात्र या शोमध्ये नुकतंच असं काही घडलं, ज्यामुळे अंकिता तिचा पती विकीवर नाराज झाली आहे.

नेमकं काय घडलं?

बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक आपापल्या खोलीत गेल्यानंतर विकी जैन, रिंकू धवन आणि इतर काही स्पर्धक मिळून एक प्रॅक करण्याचा विचार करतात. ते सर्व स्पर्धकांना एकत्र बोलावतात आणि सांगतात की, “बिग बॉसने एक डिमांड केली आहे. त्यांनी सर्व स्पर्धकांना बेड बदलण्यासाठी दोन मिनिटं दिली आहेत.” हे ऐकल्यानंतर सर्व स्पर्धक आपापला बेड निवडू लागतात. काही वेळानंतर इतर स्पर्धकांना हे समजतं की विकी फ्रँक करत होता. बिग बॉसने अशी कोणती घोषणा केलीच नव्हती.

हे सर्व घडल्यानंतर पॅक केल्यामुळे बिग बॉस विकीला ओरडतो. “विकी भैय्या, डोकं चालवायची इतकी हौस असेल तर तू अंकिताच्या मागे मागे रुम नंबर 1 मध्ये का गेलास? कदाचित तुला नॅशनल टीव्हीवर हे दाखवायचं असेल की मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो”. अशा शब्दांत बिग बॉस सुनावतो हे अंकिताला अजिबात आवडत नाही आणि ती विकीवर नाराज होते.

15 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांची एण्ट्री झाली. या स्पर्धकांना घरात एकत्र राहून अद्याप 24 ताससुद्धा झाले नाहीत आणि त्यांच्यात आपापसांत भांडणं सुरू झाली आहेत. सर्वांत आधी प्रेक्षकांना इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील कडाक्याचं भांडण पहायला मिळालं. त्यानंतर पती विकी जैनच्या एका वक्तव्यावरून अंकिता लोखंडेनं थेट त्याला चप्पल फेकून मारली. या एपिसोडचा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला होता.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments