Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजApple चा iPhone 16 ठरतोय बेस्ट फोन; विक्रीमध्ये झाली मोठी वाढ

Apple चा iPhone 16 ठरतोय बेस्ट फोन; विक्रीमध्ये झाली मोठी वाढ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : सध्या अनेक फोन मार्केटमध्येउपलब्ध आहेत. किमतीनुसार, फोन्सचे फीचर्सही चांगल्या प्रकारे मिळत आहेत. Samsung, Oppo, Vivo यांसारख्या कंपन्यांचे फोन्सला चांगली पसंतीही मिळत आहे. त्यात आता Apple चा iPhone 16 हा सर्वात बेस्ट फोन ठरताना दिसत आहे. या फोनच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Apple iPhone 16 हा 2024 मध्ये जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन बनला आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, iPhone 16 ने जागतिक स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. या अहवालात विविध कंपन्यांची विक्री आणि त्यांचे बाजारातील स्थान याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. युरोपमध्ये स्मार्टफोनची विक्री स्थिर राहिली, परंतु काही देशांमध्ये वाढ दिसून आली. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्ये iPhone 16 च्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.

तसेच Samsung ने युरोपमधील अँड्रॉईड स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. विशेषतः ब्रिटनमध्ये, Galaxy A55 सर्वात जास्त विकले जाणारे डिव्हाईस बनले आहे. Xiaomi आणि Google Pixel देखील सॅमसंगला चांगली टक्कर देताना दिसत आहेत. Pixel 9 सीरीजची विक्री Pixel 8 पेक्षा कमी होती, कारण Pixel 8 वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत होती. तर, Xiaomi 13 सीरीजही ऑफरमुळे स्पेनमध्ये चांगली विक्री झाल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments