Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजAmazon वर Valentines Day Sale सुरु; 6GB RAM असलेल्या स्मार्टफोनवर मिळतोय बंपर...

Amazon वर Valentines Day Sale सुरु; 6GB RAM असलेल्या स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना सुरु होताच तरुणाईला ‘व्हॅलेंटाईन्सडें’ची आतुरता लागते. त्यानुसार, अनेक ऑफर्स देखील लाँच केल्या जातात. असे असताना आता Valentines Day स्पेशल FAB PHONES FEST सेल Amazon वर सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहेत. हा सेल 14 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असू शकते. Samsung Galaxy M35 5G हा एक चांगला पर्याय असेल. Samsung Galaxy M35 5G 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत जरी जास्त असली तरी ऑफरनंतर 14499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हा स्मार्टफोन 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंच डिस्प्लेसह येतो. Exynos 1380 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 6000 mAh दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 13 5G हा फोनही स्वस्तात मिळू शकणार आहे. या स्मार्टफोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट 14927 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध होऊ शकतो. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये डायमेन्शन 6080 प्रोसेसर, 108 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments