इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून एक बातमी समोर आली आहे. एका तरुणावर दोघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत जखमी तरुणाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करण शिवाजी जमादार (वय 19, रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय 19, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याच वेळी दुचाकी वरून आलेल्या चार पैकी दोन जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी दोन्ही आरोपींसह त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी पीडित तरुण त्याच्या मोबाईलवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात मोबाईलवर गेम खेळत होता. त्या वेळी आरोपी करण, शुभम आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवरून आले. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. यात फिर्यादी यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.