इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : वानवडी पोलिस स्टेशन तपास पथकाने अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत सुमारे ५,८७,०५०/- रुपये किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
२७ ऑगस्ट रोजी सतीश द्वारकानाथ मकाशीर (वय ७८, रा. सोपान बाग, घोरपडी) यांनी घरफोडीची फिर्याद दिली होती. २१ ते २७ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्या-हिऱ्याचे मौल्यवान दागिने चोरून नेले होते.
या प्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने घरकाम करणारी महिला सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बोराटे वस्ती, घोरपडी) हिला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तिच्याकडून विविध प्रकारचे दागिने, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, कानातले, हिरे व मौल्यवान खडे असलेले दागिने, पुखराज, मोती, लाल खडे यासह एकूण ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार डोके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात उमाकांत महाडिक, महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी सहभाग घेतला.