Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजवरंधा घाटातील कोंढरी पुलावर वाहनांची घसरगुंडी; वाहनचालकांचा संताप

वरंधा घाटातील कोंढरी पुलावर वाहनांची घसरगुंडी; वाहनचालकांचा संताप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोरः वरंधा घाट मार्गावरील कोंढरी पुलावर आज सकाळी वाहनांची मोठी घसरगुंडी झाली. पुलावर पावसाचे पाणी व चिखल साचल्यामुळे अनेक वाहनं रस्त्यावर अडकली. त्यामुळे पुणे-कोकण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

या अनपेक्षित अडथळ्यामुळे पुणे, भोर व महाडकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहनचालक व प्रवाशांना दोन ते तीन तास पावसात थांबावे लागले. प्रवाशांचा संताप व्यक्त झाला.

दरम्यान, परिस्थितीची माहिती मिळताच संबंधित ठेकेदाराचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पुलावरील चिखल व पाणी साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले. अखेर दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

नियमित देखभालीअभावी असे प्रकार घडत असल्याची टीका वाहनधारकांकडून करण्यात आली. तर घाटातील रस्त्यांच्या कामाबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments