इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळणार आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज (बुधवार, २० ऑगस्ट) रोजी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असून, यामुळे औंध आणि शिवाजीनगर भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एकात्मिक दुमजली पुलाची उभारणी विद्यापीठ चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केली आहे. यासाठी सुमारे 277 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. दरम्यान, वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका लवकरच होणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी केली आहे. या उड्डाणपुलामुळे शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.