Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजज्येष्ठांसाठी 'एल्डरलाइन 14567' हेल्पलाइन ठरतेय वरदान; 4 लाखांहून अधिक वृद्धांना मिळाली मदत

ज्येष्ठांसाठी ‘एल्डरलाइन 14567’ हेल्पलाइन ठरतेय वरदान; 4 लाखांहून अधिक वृद्धांना मिळाली मदत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाइन 14567’ देशभरातील वृद्धांसाठी मोठा आधार बनली आहे. आतापर्यंत या हेल्पलाइनवर 4 लाखांपेक्षा जास्त कॉल्स आले असून, त्यापैकी 30 हजारांहून अधिक प्रकरणांचे यशस्वीरित्या निकाल लावण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठांना मोठी मदत होत आहे.

वर्षात फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या 3 दिवशीच सुट्टी असते. त्या व्यतिरिक्त ही हेल्पलाइन आठवड्याचे 7 दिवस, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कार्यरत असते. या सेवेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक http://www .elderline.dosje.gov.in या संकेतस्थळावरही माहिती मिळवू शकतात.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सुरू केलेली ही सुविधा, मुले परदेशात असलेल्या वृद्धांना, हरवलेल्या ज्येष्ठांना किंवा कौटुंबिक अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देते. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा मोफत पुरवली जाते. यात वृद्धाश्रम, आरोग्य, पेन्शन, सरकारी योजना, कायदेशीर मार्गदर्शन, भावनिक आधार, कौटुंबिक वाद आणि पोलिसांची मदत अशा विविध सेवांचा समावेश आहे.

ही हेल्पलाइन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये आधीच सुरू आहे. इतर राज्यांमध्येही ती लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments