Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजदमदार पावसामुळे शहरातील धरणांतून पाण्याचा विसर्ग; अग्निशमन दलाकडून नदीकाठच्या परिसरात नागरिकांना सुरक्षिततेचे...

दमदार पावसामुळे शहरातील धरणांतून पाण्याचा विसर्ग; अग्निशमन दलाकडून नदीकाठच्या परिसरात नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पावसामुळे पुणे शहर परिसरातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढत आहे, त्यामुळे अग्निशमन दल विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या परिसरात मेगाफोनद्वारे नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करत आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २६.५४ टीएमसी म्हणजे ९१.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अशातच खडकवासला धरणातून नदीत १८ हजार ४८३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. वरसगाव, पानशेतधरणातूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

अशातच नागरिकांनी नदी दुथडी भरून वाहत असल्याने शहराच्या विविध पुलांवर पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या गर्दीला रोखण्यासाठी तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी पुणे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा अलर्ट झाली असून, अग्निशमन दल देखील नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी नदीकाठच्या परिसरात थांबून सुरक्षिततेचे आवाहन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments