Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय दीपक टिळक यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, आमदार विजय शिवतारे, स्वर्गीय दीपक टिळक यांचे पुत्र रोहित टिळक, स्नुषा प्रणति टिळक, मुलगी गीताली टिळक, नातू रौनक टिळक आदी उपस्थित होते.

शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन झाले असून आपल्या सर्वांसाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. डॉ. टिळक यांनी संपादक म्हणून काम पाहिले असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य, मराठी संस्कृतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्राच्या माध्यामातून दिलेल्या लढ्याचा वारसा टिळक परिवार पुढे नेत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments