इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खडकवासला : सिंहगड परिसरात रिंगरोडचे काम चालू आहे. नविन रिंगरोड मुळे अवजड वाहने माल घेवून या रस्त्याने ये-जा करत आहेत. त्यामुळे या रस्त्याची परिस्थीती एकदम खराब झाली आहे अशा परिस्थितीत या रस्त्यांवर गाडीचालणे अवघड झाले आहे.
मागील आठवड्यात पुणे आयुक्त कार्यालय येथे रिंग रोड प्राधिकरणाचे पाटील व प्रांत अधिकारी माने यांच्यासोबत नागरिकांची या विषयावर मीटिंग झाली होती. रस्ता आणि खरमरी येथील पुलाला तडे गेल्या बाबत प्राईम न्युज मध्ये बातमी पसिद्ध झाली होती. प्रात साहेबांनी बातमीतील सत्यता पाहताच ठेकेदाराला रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यास सांगितले होते.
मात्र, आजूनही काहीच कारवाई व काम चालू केलेले नाही. अशातच नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खामगाव मावळचे पोलीस पाटील संदिप कांबळे संपर्क साधला आसता या रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे असे अवाहन प्रांत साहेबांना केले आहे.