Friday, August 29, 2025
Homeक्राईम न्यूजयवतमध्ये खोट्या सह्या करून लाखोंची फसवणूक, ग्रामसंघाच्या सीआरपीवर गुन्हा दाखल

यवतमध्ये खोट्या सह्या करून लाखोंची फसवणूक, ग्रामसंघाच्या सीआरपीवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत (पुणे): यवत – भांडगाव प्रभागातील ग्रामसंघाच्या सीआरपीयांनी अध्यक्ष व सचिव यांच्या खोट्या सह्या करून व शिक्के वापरून १४ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ग्रामसंघाच्या सीआरपीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवत – भांडगाव प्रभागातील सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या गौरी स्वप्नेश काळे यांनी दि. १४ जुन २०२३ पासून ३० एप्रिल २०२५ पर्यंत यवत -भांडगाव प्रभागसंघाच्या व काळभैरवनाथ ग्रामसंघ यवत खात्यावरून अध्यक्ष व सचिवांच्या खोट्या सह्या करून व खोटे शिक्के वापरून एकूण १४,६१,५००/-रूपयांचा शासकिय निधी व ग्राम संघ समूहाचे भागभांडवल परस्पर स्वतःच्या खात्यावर व इतरांच्या खात्यावर वळते करून फसवणूक केली असल्याची फिर्याद दिक्षा संदीप भालेराव यांनी केली होती.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गौरी स्वप्नेश काळे (रा. यवत ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड हे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments