Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात वडिलांनी मुलाचा केला गळा दाबून खून; फुरसुंगी परिसरातील खळबळजनक घटना

पुण्यात वडिलांनी मुलाचा केला गळा दाबून खून; फुरसुंगी परिसरातील खळबळजनक घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनामुळे सतत घरात वाद घालणाऱ्या 35 वर्षीय मुलाचा त्याच्या वडिलांनी गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव प्रशांत सुरेश जमदाडे (वय 35) असून, आरोपी वडील सुरेश बाबुराव जमदाडे (वय 59, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत याला दारूचे व्यसन होते आणि तो दारू पिऊन घरी आल्यावर अनेकदा आई-वडिलांना शिवीगाळ करत असे. शनिवारी रात्री अशाच एका वादावादी दरम्यान वडील सुरेश जमदाडे आणि मुलगा प्रशांत यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाच्या रागात वडिलांनी प्रशांतला खाली पाडून एका कापडी गमजाने गळा दाबून त्याचा श्वास रोखला, तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून त्याचा खून केला.

पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments