Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजते' हिरवं पाणी म्हणजे पाण्यातील शेवाळं, नागरिकांनी घाबरू नये'; सहायक अभियंता योगेश...

ते’ हिरवं पाणी म्हणजे पाण्यातील शेवाळं, नागरिकांनी घाबरू नये’; सहायक अभियंता योगेश भंडलकर यांची माहीती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर : तालुक्यातील भाटघर धरणातील पाणी (दि.२१) दुपारी अचानक हिरवे दिसू लागल्याने धरण काठावरील नर्हे, माळवाडी, संगमनेर, भाटघर सांगवी परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली. धरणातील पाणी दूषित झाले असून आरोग्यास हानिकारक असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागल्याने हा एक गंभीर मुद्दा बनला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच निरा पाटबंधारे उप विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, मत्स्यपालन व्यावसायिकदार यांनी धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जलाशयात शेवाळ (Algae Formation) वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते त्यामुळे जलाशयातील पाण्याला काही काळ हिरवा रंग दिसून येतो. तो काही कालावधीत पूर्ववत होतो.’

पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजता धरणातील पाण्याची पाहणी केली असता हिरवे दिसणारे पाणी पूर्ववत झाल्याचे दिसून आले. याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याशी देखील वेळोवेळी चर्चा झाल्याचे भंडलकर यांनी कळवले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. दक्षता उपाय म्हणून पाण्याची तपासणी करण्यात येईल. नागरिकांनी गैरसमज पसरवू नये असे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments