Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे-दौंड रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक : 20 जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना महत्वाच्या सूचना

पुणे-दौंड रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक : 20 जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना महत्वाच्या सूचना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे-दौंड रेल्वेमार्गावर रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक जाहीर केला आहे, ज्यामुळे २० जुलै २०२५ पर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा मेगाब्लॉक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी घेण्यात येत आहे. या मेगा ब्लॉकमुळे आता प्रवाशांचे हाल होऊ शकतात. रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉगपूर्वी प्रवाशांना याबाबत सूचना केल्या आहेत. जेणेकरून प्रवासी पर्यायी व्यवस्था करू शकतील.

रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुणे-दौंड मार्गावरील काही डेमू आणि एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये 11409 दौंड-निजामाबाद डेमू, 11410 निजामाबाद-दौंड डेमू, 17629 पुणे-हुजूरसाहिब नांदेड एक्सप्रेस आणि 17630 हुजूरसाहिब नांदेड-पुणे एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्या दौंड ते परभणी दरम्यान पर्यायी मार्गाने धावतील, परंतु नियमित थांबे रद्द करण्यात आले आहेत.

अशातच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून चालू वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला असून, कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत प्रवाशांनी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments