इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या १८ समर्थकांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सागर धाडवे यांच्या पत्नी चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला की, वीजचोरी आणि भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात ठेवून धीरज घाटे समर्थकांकडून धमकी, धाडस आणि एकाच ड्राफ्टवर घर पाडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली, तरी पोलीस चौकशीस टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेस अॅड. आकाश साबळे, सागर धाडवे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. धाडवे यांच्यावर होत असलेला अन्याय, धमक्या आणि जातीय द्वेषाचे स्वरूप गांभीर्याने घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.