Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजखडकवासला स्मशानभूमीत मागणी नसतानाही विद्युत दाहिनी बसवण्याचा घाट; महापालिका आधिकारी व ठेकेदारांची...

खडकवासला स्मशानभूमीत मागणी नसतानाही विद्युत दाहिनी बसवण्याचा घाट; महापालिका आधिकारी व ठेकेदारांची हातमिळवणी?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खडकवासलाः खडकवासला गाव पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केले आहे. याठिकाणी अनेक रस्ता ड्रेनेज, विद्युत खांब, शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था अशी आवश्यक कामे करणे गरजेचे असताना ती बाजुला करून नको त्या कामांना महापालिका आधिकारी ठेकेदारांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची बिले मजुर करून घेत आहेत.

त्यातीलच ऐक प्रकार म्हणजे खडकवासला स्मशानभुमीमध्ये विद्युत दाहीनी बसवण्याचा घाट महापालिका आधिकारी यांनी ठेकेदारांना हाताशी धरून घातला आहे. १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या खडकवासला गावाला विद्युत दाहीनीची गरजचं काय? हाच लोकांना पडलेला प्रश्न आहे. बाजुला धायरी नांदेड सारख्या लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात विद्युत दाहीनीची गरज जास्त आहे. मात्र गरज नसताना खडकवासला स्मशानभुमीमध्ये बसवली जात आहे.

विद्युत विभागातील महापालिका आधिकारी मोरे यांना विचारणा केली असता त्या फोन घेत नाहीत. महापालिकेनं दिड वर्षा पुर्वी उभारलेल्या खांबावर अजून दिवे बसवण्यात आलेले नसून आणखीन एक विद्युत दाहीनी बसवण्याचा घाट महापालिका आधिकारी ठेकेदारांना खुष करण्यासाठी घालत आहे. मनसे या विरोधात आंदोलन करणार असल्याचे खडकवासला मतदारसंघ मनसे अध्यक्ष विजय मते यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments