Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजचोरटे निघाले देवाचे भक्त...! आधी नमस्कार केला, मग पैसे चोरले; पुण्यातील चोरट्यांनी...

चोरटे निघाले देवाचे भक्त…! आधी नमस्कार केला, मग पैसे चोरले; पुण्यातील चोरट्यांनी चर्चा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर चोरट्यांनी हद्दचं पार केली. देवाचा आशीर्वाद घेऊन चक्क दानपेटीतूनच पैसे लंपास केल्याची घटना सामोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पिंपरी- चिंचवडमधली ही घटना आहे. चहोली येथील वरमुखवाडी परिसरात असलेल्या साई मंदिराच्या आवारातील महादेवाच्या मंदिरात ही चोरी झाली. शनिवारी दुपारी तीन चोरटे मंदिरात शिरले महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे घेऊन पळून गेले. दानपेटीतून पैसे काढताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले.

हे चोरटे 18 ते 25 वयोगटातील असल्याची माहिती समोर येत आहे. या चोरीनंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने याबाबत दिघी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीचा तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत असून लवकरच चोरट्यांना बेड्या ठोकल्या जातील.

दरम्यान, देवाला नमस्कार करून केलेली ही चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments