इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं एक वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुणे हे फडणवीस यांचं बेबी असल्याचं त्यांनी म्हटलंय. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं अमृता फडणवीस पुण्यात होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेकवेळा पुण्याचा दौऱ्या केला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर विशेष प्रेम आणि लक्ष का आहे?. असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे पुणे हे देवेंद्र फडणवीस यांचं एक बेबी आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही आपलीच मुलं आहेत, असं विचार करून देवेंद्र फडणवीस चालतात. असं उत्तर त्यांनी दिलं. त्यांचं हेच वक्तव्य सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
पुढे बोलताना त्या म्हणल्या, ‘पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत. मला देखील अनेकदा वाटतं की, रस्ते अजून चांगले झाले पाहिजेत. वाहतूक अधिक सुरळीत पाहिजे. मेट्रोमुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये फरक पडला असून आणखी एक मेट्रो मार्ग तयार होणार आहे. ज्याचा पुणेकरांना फायदा होणार आहे. त्यामुळे सामान्य माणूस जोपर्यंत सुखद आयुष्य जगत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे पुण्याचा दौरा करत राहतील.’ असंही म्हणाल्या.