Saturday, July 12, 2025
Homeक्राईम न्यूजपिंपरी-चिंचवडमध्ये १६० कोटींच्या थकबाकीवर महापालिकेची जप्ती कारवाई सुरू

पिंपरी-चिंचवडमध्ये १६० कोटींच्या थकबाकीवर महापालिकेची जप्ती कारवाई सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलनविभागाने मागील आर्थिक वर्षातील ३४ हजार ७६९ थकबाकीदार मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६० कोटी रुपयांची थकबाकी असून, वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेकडे एकूण सात लाखांहून अधिक मालमत्ता नोंदणीकृत असून, यापैकी चार लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी चालू आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत कर भरला आहे. या करदात्यांना ३५ कोटी रुपयांहून अधिक सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ही संख्या तीन लाख ३७ हजारांपर्यंत पोहोचली आहे. ऑनलाइन भरणा प्रोत्साहनासाठी महापालिकेने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सामान्य करावर चार टक्के सवलत जाहीर केली आहे.

ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर कर भरावा आणि सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments