इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : एकीकडे ठाकरे गट आणि मनसे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याची लगबग सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधासभेत हक्कभंग मंजूर करण्यात आला आहे. अशातच आता त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
मागील विधीमंडळाच्या अधिवेशनादारम्यान कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या एका शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे गायले होते.
कुणाल कामराने त्याच्या एका शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खिल्ली उडवणारे गाणे गायले होते. कॉमेडियनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिथे कार्यक्रम जिथे झाला होता तिथे जाऊन त्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यानंतर राज्यातील हा वाद बराच काळ चालला. अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत होते.
याचदरम्यान, सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचे गाणे गात एक व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे या दोघांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आता मंजूरी मिळाली आहे. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोमवारी नोटीस काढली जाणार आहे. अशातच आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्यावर काय कारवाई होणार हे महत्वाचे ठरणार आहे.