इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : दापोडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या वादातून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री घडली आहे.
साकिब रफिक शेख (32, रा. लोहगाव), रवी मसलिंगाप्पा लकाबशेट्टी (24, रा. विश्रांतवाडी), मोहसीन हनीप शेख (20, रा. येरवडा) अशी आरोपींची नावं आहेत. ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मोईउद्दीन ऊर्फ मुन्ना रफिक शेख (29, रा. दापोडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोईउद्दीन हे त्यांच्या मित्रांसह एका रिक्षात बसले होते. त्यावेळी आरोपी साकिब शेख हा त्याच्या साथीदारांसह तिथे आला आणि जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी साकिबने मुन्ना याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने मुन्ना यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. यावेळी आरोपीने मुन्ना यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी देखील केले. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी येणाऱ्यांना देखील मारण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी परिसरातील वाहनांची तोडफोड करून तिथून फरार झाले.