इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ फेम शेफाली जरीवाला हिचा २७ जून रोजी कार्डिक अरेस्टने मृत्यू झल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. शेफाली फक्त 42 वर्षांची होती. एवढ्या कमी वयात अभिनेत्रीसोबत असं काही घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यू बाबत अनेक अफवा समोर आल्या. मात्र, आता तिच्या मृत्यूबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी शेफालीच्या घरी पूजा असल्याने तिचा उपवास होता. उपवास असतानाही तिने अँटी-एजिंग औषधाचे इंजेक्शन घेतले. तिने काहीही न खाता इंजेक्शन घेतल्यामुळे तिला त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहेत.
शेफालीच्या मृत्यूनंतर पोलिसांना तिच्या घरात दोन औषधे मिळाली. ही औषधं शेफाली रोज घेत होती. उपवासात देखील तिने ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘ग्लुथाथिओन’ ही औषध घेतली.
तसेच तीनं फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न देखील खाल्लं आल्याचं समोर आलं. शिळं अन्न खाल्ल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. आणि ती जमिनीवर कोसळली. अभिनेत्रींच्या पतीने तिला तातडीने रुग्णालयात नेले परंतु कोणतेही उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, शेफालीच्या मृत्यूनंतर प्राथमिक तपासात झालेला हा खुलासा धक्कादायक आहे. कमी वयात शेफालीचा मृत्यू झाल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.